Ad will apear here
Next
‘संगीत आनंदासाठी आहे, मुलांना त्याचा ताण देऊ नका’
शंकर महादेवन यांचे आवाहन
प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी पुण्यातील कोथरूड येथील त्यांच्या ॲकॅडमीमध्ये मुलांना संगीताचे धडे दिले.

पुणे : ‘सुरांमध्ये खेळणे, त्याच्या नादात रममाण होणे यामुळे जीवनातील आनंद वाढतो. संगीत आयुष्याची सुंदरता वाढवते. रोजचे ताण कमी होतात आणि तुमची एकाग्रता, कार्यक्षमता आपोआपच वाढते; मात्र हल्लीचे पालक ‘रिअॅलिटी शो’ सारख्या कार्यक्रमांद्वारे मुलांवरचा संगीताचाच ताण वाढवतात. मुलांचे बालपण हिरावून घेऊ नका. त्यांना संगीताचा आनंद घेऊ द्या,’ असे आवाहन प्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री शंकर महादेवन यांनी केले.

पुण्यातील कोथरूड येथील शंकर महादेवन अकादमीच्या वतीने ‘विद्यारंभ’ या गाणं शिकू इच्छिणाऱ्या मुलांसाठी आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी संगीत शिकू इच्छिणाऱ्या मुलांना संगीताचे धडे दिले. हा कार्यक्रम विनामूल्य आयोजित करण्यात आला होता. या वेळी शंकर महादेवन अकादमीचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर रंगनाथन, अकादमीचे सहसंस्थापक नितीन कोमवार, चित्रपूर मठाचे प. पु. स्वामीजी, अकादमीचे संचालक प्रवीण कडले आदी उपस्थित होते.  


 विद्यार्थ्यांशी संवाद साधत शंकर महादेवन यांनी सात सूर, ताल आणि त्यातील वेग यांचे पायाभूत धडे या विद्यार्थ्यांना दिले. या वेळी अगदी अडीच वर्षांपासून ते ६० वर्षांपर्यंतचे विद्यार्थी उपस्थित  होते. 
 
ते म्हणाले, ‘जगातील प्रत्येक नाद हा केवळ सात सुरांमध्ये गुंफलेला आहे. त्याचा आनंद सगळीकडे पसरविण्याच्या हेतूनेच या अकादमीची सुरुवात झाली आहे. येथे कोणी आवड म्हणून, कोणी ज्ञान मिळविण्यासाठी तर कोणी अगदी खोलात शिरण्यासाठी संगीत शिकत असेल. तुमचा उद्देश कोणताही असला, तरी संगीताचा आनंद घेता येणे हे जास्त महत्त्वाचे आहे. संगीत ही एक भाषा आहे. त्यातून तुम्ही मुलांना मूल्य शिक्षणही देऊ शकतात किंवा इतिहास-भूगोलही शिकवू शकतात. जगातला कोणताही विषय संगीतातून सहज शिकता व शिकवता येऊ शकतो. त्यासाठी प्रत्येकाने सादरकर्ते होण्याची आवश्यकता नाही.’ 


या वेळी त्यांनी मुलांना ‘कट्यार काळजात घुसली’ या गाजलेल्या चित्रपटातील स्वत: गायलेले प्रसिद्ध भजन ‘सूर निरागस हो...’ आणि ‘कल हो ना हो..’ या गाण्याचे सूरही शिकविले.

पुणे हे आपले एक अत्यंत आवडीचे ठिकाण असल्याचे सांगत ते म्हणाले, ‘पुण्यात मी कधी ‘सवाई’मध्ये शास्त्रीय संगीत गायला, कधी फ्युजन गायला, तर कधी चित्रपट गीते गायला आलो. पण या प्रत्येकच प्रकारात पुण्याने मला कायमच भरभरून प्रेम दिले. येथील श्रोते फारच चोखंदळ आणि गुणग्राही आहेत.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZJZCH
Similar Posts
पुणेकरांनी अनुभवली मांगल्याची ‘स्वर-प्रभात’ पुणे : नुकतीच सुरू झालेली थंडी... सभोवताली पसरलेली धुक्याची शाल... अन मंत्रमुग्ध करणारे सनईचे सूर...अशी मंगलमय सकाळ पुणेकरांनी अनुभवली. निमित्त होते पहाटेच्या रागांवर आधारित ‘स्वर प्रभात’ या कार्यक्रमाचे.
‘सिम्बायोसिस’ने पटकावले ‘एन्थुजिया’चे विजेतेपद पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटतर्फे (अंडर ग्रॅज्युएट) आयोजित दोन दिवसीय ‘एन्थुजिया’ महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद सिम्बायोसिस महाविद्यालयाने पटकावले.
गजेंद्र अहिरे यांचा हिंदी कवितासंग्रह लवकरच; ‘बुकगंगा’तर्फे होणार प्रकाशित पुणे : संवेदनशील दिग्दर्शक म्हणून परिचित असलेले गजेंद्र अहिरे हे उत्तम लेखक, कवी, गीतकारही आहेत. त्यांनी लिहिलेल्या हिंदी कविता, गझल यांचे ‘आधा पागल’ हे पुस्तक ‘बुकगंगा’तर्फे लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहे.
सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून ‘सवाई’ला सुरुवात पुणे : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यान या ठिकाणी असलेल्या सवाई गंधर्व यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून, बुधवार, ११ डिसेंबर रोजी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला औपचारिक सुरुवात करण्यात आली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language